तू म्हणजे एक स्वप्न... !
भल्या पहाटे पडणारे,
तरीही खोटे ठरणारे......
तू म्हणजे एक स्वप्न... !
मनात दडून ठेवलेले,
कितीही भासविले तरीही, डोळ्यातून ओघळणारे......
तू म्हणजे एक स्वप्न... !
श्वासाश्वासात भिनलेले,
तरीही, दूर दूर असणारे......
तू म्हणजे एक स्वप्न... !
तुझ्या आठवणीत जगणारे,
मित्र जवळ असुनही, तुलाच शोधत फिरणारे ......
तू म्हणजे एक स्वप्न... !
दिवस सुद्धा छळणारे,
ती सोबत नसतानाही, असल्याचे भासविणारे......
तू म्हणजे एक स्वप्न... !
आठवणींचा कोंडवाडा करणारे,
अनेकदा सावरले तरीही, पुन्हा सर्व पसरणारे ......
तू म्हणजे एक स्वप्न... !
माझे कधीही न झालेले,
तू दूर असलीस तरीही, तुझ्या भेटीसाठी तळमळणारे......
तू म्हणजे एक स्वप्न... !
तुझ्या विरहात एकटेच जगणारे,
तू जिंकाविस म्हणून, कितेकदा स्वत:लाच हरविणारे......
तू म्हणजे एक स्वप्न... !
येण्याची तुझ्या, त्याच वळणावर वाट पाहणारे,
प्रत्येक वसंतात झडूनही, पालवीची आस धरणारे ......
तू म्हणजे एक स्वप्न... !
सप्तासुरांत विणलेले,
मला मात्र नव्या सूराला वाव देणारे ......

mast
ReplyDeletechaan aahe