Pages

Popular Posts

Thursday, October 21, 2010

अशाच एका संध्याकाळी

अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना
असे घडावे अवचीत काही तुझ्या समीप मी असताना

अशाच एका संध्याकाळी एकांताची वेळ अचानक
जवळ नसावे चिट्टपाखरु केवळ तुझी नि माझी जवळीकसंकोचाचे रेशीम पदडे हा हा म्हणता विरुन जावे
समय सरावा मंद गतीने अन् प्रितीचे सुर जुळावे
मी मागावे तुझीयापाशी असे काहीसे निघताना
उगीच करावे नको नको तु हवे हवेसे असताना
शब्दावाचुन तुला कळावे गुज मनी या लपलेले
मुक्तपणे तु उधळून द्यावे जन्मभरी जे जपलेले

No comments:

Post a Comment