Pages

Popular Posts

Tuesday, January 18, 2011

आज विसरायचं ठरवल...

आज विसरायचं ठरवल...


मनात भरून राहिलेल्या गोष्टी आज सांडायच ठरवल
काहीही झाल तरी आज नियतीशी भांडायचं ठरवल

माझ्याच सावलीने आज साथ सोडायचं ठरवल

मग का उगाच मी माझंच मन तोडायचं ठरवल

हळुवार जपलेल्या आठवणींना आज विसरायचं ठरवलखोलवर रुतलेल्या काट्यांना आज काढायचं ठरवल
रक्ताळलेल्या जखमांना आज बांधायचं ठरवल

हळुवार फुंकर घालून त्यांना शांत करायचं ठरवल

मनाला होणाऱ्या भासांना आज संपवायचं ठरवल
अंधारात स्वतःलाच शोधायचं ठरवलं

उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आपलंस करायचं ठरवलं

हरवलेल्या गोष्टींना आज विसरायचं ठरवल...

एक प्रेम कथा..

एक प्रेम कथा..


ती जन्मताच आंधळी, त्यामुळे सगळ्यांच्याच तिरस्कारास पात्र.
आई-वडील, सख्खे भाऊ, बहिणींही एक डोक्यावरचंन टाळता येणार ओझं म्हणून सहन करणारे.
ह्यात एकच समाधानाची बाब म्हणजे तिचा प्रियकर.
तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा, तिच्या अंधपणाचा कोणताही बाऊ न करता.
मग तिला वाटायचे आपण खुप नशिबवान आहोत.
तिने कित्येक वेळेस त्याला म्हंटले सुद्धा, "जर मला दृष्टी लाभली असती तर तुझ्याशीच लग्न करून, शेवट पर्यंत साथ दिली असती."
आणी अचानक एके दिवशी चमत्कार झाला.
कोणीतरी तिला आपले डोळे देण्यास तयार झाला.
शेवटी यशस्वी शस्त्रक्रिये नंतर दिला दिसू लागले.
सर्व प्रथम तिने प्रियकराला पाहण्याचा हट्ट धरला.
त्याला पाहताच तिला जबरदस्त धक्का बसला.
तो चक्क आंधळा होता.
तेवढ्यात त्याने विचारले, "करशील आता माझ्याशी लग्न?"
तिने सहजतेने त्याचा प्रस्ताव नाकारला.
त्याने कांहीही प्रतिक्रीया व्यक्त केली नाही.
तिच्यापासुन दुर जाताना फक्त एवढेच म्हणाला, "माझ्या डोळ्यांची काळजी घे."
ती उघड्या डोळ्यांनी पहातच राहिली.

एक कथा..

एक कथा..


त्याला ती एका पार्टीत भेटली.
खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते.
ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.

तो फार साधा, आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा.
त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच!
तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!!!

पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं,
'तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?'

तिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं.
ती 'हो' म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं.
या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!!!

जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली.
कॉफीची ऑर्डर दिली.
पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता.
आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली.
झक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!!!

कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला.
त्यानं वेटरला हाक मारली.
वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला.
तो म्हणाला, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!'

सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं.
विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले.
तीसुध्दा!

वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा अर्थाचा चेहराही केला.
त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला!
ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क मीठ!

अखेरीस तिनं विचारलंच "पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?"
"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...
"सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे.
आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे.
खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.

तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं.
किती हळुवार होतं त्याचं मन.
मग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान डेट झाली ती!!!

मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले.
अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी.
तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता.
मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं!
चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले.
एखाद्या परीकथेसारखे.

खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं.
ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा!
आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या कॉफीत!

अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही.
एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच उठण्यासाठी...!
काही दिवसांनी ती सावरली.
रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली.
एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली.
त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.
"माझ्या प्रिये, मला माफ कर!
आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो...
पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही...
केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!

प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती!
त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे.
आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं...
खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती!
पण मला तु खुप आवडतेस...
आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो...
...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे नाही तर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही!
प्लीज - मला माफ करशील?"

नात्याला या नकोच नाव

दोघान्चही एकच गाव!
वेगवेगळे प्रवास तरीही
समान दोघान्मधले काही !
ठेच लागते एकाला
का रक्ताळे दुसयाचा पाय?
तुझे नी माझे नाते काय?...

भेट तुझी स्मरताना
भेट तुझी स्मरताना तो क्षण हवासा वाटतो.
न कळत येणाऱ्या आठवणींना,
हे हसू आवरेनासं होतं.
अबोल माझ्या ओठांना,
तुझ्या ओठांनी चव दिली.
एकाच ठिकाणी तासंनतास बोलण्याची सवय लावली.
विषयाचं ताळ तंत्र दोघांनाही नाही.
काहीही बोलत असतो।
जे दोघांनाही पटत नाही.
भेट तुझी स्मरताना
त्या आठवणीत रमून जावसं वाटतं
तासंन तास तुझ्या मिठीत स्वतःला जखडून घ्यावसं वाटतं.
चुंबनाच्या स्पर्शाने,
तुला रोमांचित करावसं वाटतं.
अंग अंग शहारुन, तुला वेडां पिसं करावसं वाटतं.
प्रत्येक भेटीत तुला पुन्हा भेटावसं वाटतं.
भरभरून मिळालं प्रेम, तरी ते कमीच वाटतं.
भूक माझी भरपूर आहे असं नेहमी तुला वाटतं.
भेट तुझी स्मरताना
नव्याने भेटण्याची इच्छा होते.
तुझ्या प्रेमाची जादू
मला वेड पिस करते.
निरागस तुझं हास्यं, एकटक पहावसं वाटतं
भेट तुझी स्मरताना
आठवणींची दृष्ट काढावी वाटतं.
कुणाचीही नजर न लागता
तुला पुन्हा भेटावसं वाटतं.
शेवटचा श्वासापर्यंत तुझ्यावर फक्त तुझ्यावरच
भरभरून प्रेम करावसं वाटतं।

जोडीदार....jodidar....

आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
एकमेकांना दिलेल्या दुःखांवर
एकमेकांन सोबत घालवलेल्या अनेक
आनंदी क्षणांचा लेप लावण्यासाठी..
आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
अनेक जुन्या आठवणींनी आणलेले
एकमेकांच्या डोळ्यातील
आनंदाश्रु पुसण्यासाठी.....
आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
आयुष्यात पुढे येणारया अनेक
दुःखी क्षणांच्या वेळी एकमेकांच्या
हातात चेहरा लपवून मनसोक्त रडण्यासाठी!
आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
प्रत्येक दुःखी क्षणानंतर येणारया आनंदी क्षणात
एक मेकांचा हात धरण्यासाठी,
एकमेकांना सावरण्यासाठी............

Saturday, December 18, 2010

अशीच यावी तु...

अशीच यावी तु...मनाने धुंदीत गान गावे
होऊन पाखरु त्याने जाऊन मग आकाशी भिडावे

अशीच यावी तु... मग सरिलाही विसर पडावा
तुझ्याच गालावर पडण्या तिचाही प्रत्येक थेंब चिंब व्हावा

अशीच यावी तु...कळीलाही जेव्हा गंध नसावा
होऊन फ़ुल तिने सुगंध तुझाच लपेटुन घ्यावा

अशीच यावी तु...मलाही जेव्हा ठाउक नसावे
स्वप्नांतुन बाहेर येता समोर पुन्हा तुच दिसावे

अशीच यावी तु...त्या चांदराती चंद्रालाही भुल पडावी
पाहुन तुज मिठीत माझ्या त्यालाही चांदणीची आठवण व्हावी...
 
--sandeep